Lairai Jatra In Shirgaon Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Lairai Jatra: शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. आज (सोमवारी) पहाटे या जत्रोत्सवाची सांगता झाली.

Manish Jadhav

Lairai Jatra: शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. आज (सोमवारी) पहाटे या जत्रोत्सवाची सांगता झाली.

यंदा जत्रोत्सवाला भाविकांचा महापूर लोटला होता. जत्रोत्सवानिमित्त काल (रविवारी) सकाळपासूनच धोंड भक्तगणांसह देवीवर अफाट श्रद्धा असलेल्या भाविकांची पावले शिरगावकडे वळत होती. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर तर भक्तांच्या गर्दीत वाढ होत गेली. रात्री तर शिरगावात भक्तांचा महापूर लोटला होता.

गोव्यासह (Goa) शेजारील राज्यांतील धोंड भक्तगण मिळून दोन लाखांहून अधिक भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थिती लावल्याचा अंदाज आहे. दरम्यान, जत्रेवर पावसाचे सावट असतानाही जत्रा सुरळीतपणे साजरी झाली. होमकुंड उत्सवापूर्वी रात्री शिरगावात पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र देवीच्या कृपेने पावसाचे संकट दूर झाले, अशी भावना भाविक व्यक्त करीत होते.

फटाक्यांची आतषबाजी

दिवसभर विविध पारंपरिक धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मध्यरात्रीपासून होमकुंड उत्सवाला प्रारंभ झाला. पारंपरिक विधी झाल्यानंतर रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि वाजतगाजत देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्यात आला. मध्यरात्री पारंपरिक पद्धतीने होमकुंडाला अग्नी पेटविण्यात आल्यानंतर देवीचे मुर्डी येथे प्रयाण झाले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अग्निदिव्यास प्रारंभ झाला. 'लईराई माता की जय' असा जयघोष करत हजारो धोंड भक्तगणांसह श्री लईराई देवीने पेटत्या होमकुंडातून अग्निदिव्य केले. आज सोमवारी पहाटेपर्यंत हा थरार सुरू होता.

कौलोत्सवाला प्रारंभ

शिरगावात आजपासून देवी लईराईच्या कौलोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. कौलोत्सवालाही भाविक गदीं करतात. चार दिवस गावातील प्रमुख वाड्यांवर हा कौलोत्सव साजरा होणार आहे. गुरुवारी (ता.16) वडाचावाडा येथे कौलोत्सव साजरा झाल्यानंतर देवीच्या कळसाचे मंदिरात आगमन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT