Ravi Naik | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: ‘संजीवनी’च्या जागेत ट्रक टर्मिनल

Ravi Naik: वाहतूक कंत्राटदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

दैनिक गोमन्तक

Ravi Naik: सरकारच्या मान्यतेने धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या दोन लाख चौमी. जमिनीत लवकरच सरकार ट्रक टर्मिनल उभारणार आहे, असे कृषिमंत्री रवी नाईक यांनी गुरूवारी सकाळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. संजीवनी साखर कारखान्याच्या सभागृहात नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कंत्राटदार व सरकारी अधिकाऱ्याची बैठक झाली.

बैठकीत संजीवनी साखर कारखान्याचे प्रशासक सतेज कामत, कृषी खात्याचे मुख्य सचिव अरुण कुमार मिश्रा, संचालक नेवील आफोन्सो, फोंडा व धारबांदोडा तालुक्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक,पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची बाकी द्यावी !

‘संजीवनी’ त एकूण 8.5 हजार शेतकऱ्याची नोंद आहे परंतु काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड सोडलेली असली तरी त्यांचा शेअर्स त्या ठिकाणी आहेत.संपूर्ण राज्यात आज 850 शेतकरी सक्रिय आहेत. त्यांच्याकडून ऊस या कारखान्यात येतो.

पण गेल्या तीन वर्षापासून येथील कारखाना ऊस घेत नसून खानापूर येथे पाठवत असल्याने ऊस क्षेत्र कमी झाले आहे. ‘संजीवनी’ने शेतकऱ्यांचे बाकी असलेले देणे द्यावे.

टर्मिनलमध्ये वाहतूकदारांना सुविधा

अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही ट्रक टर्मिनलची अत्यंत आवश्यकता आहे. अवजड वाहने रस्त्यालगत पार्क केली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ‘संजीवनी’च्या २ लाख चौमी जागेत ट्रक टर्मिनल उभारून चांगली सोय केली जाणार आहे.

येथे सर्व वाहतूक कंत्राटदारांची कार्यालये, चालकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याचे मंत्री नाईक म्हणाले.

बळकावलेली जमीन ताब्यात घ्या !

‘संजीवनी’ ची साडेअकरा लाख चौमी जमीन आहे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारने त्यातील 4 लाख चौमी.जमीन सरकारने कॉलेजसाठी दिली आहे.

या जमिनीचा काही भाग अन्य लोकांनी बळकावला आहे. तेव्हा सरकारने जमिनीचे फेरसर्वेक्षण करून लोकांनी बळकावलेली जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT