Thief  Dainik Gomantak
गोवा

Goa Market: वा रे पठ्ठ्या..! कुळे बाजारात पोलिस स्थानकाच्या अवघ्या अंतरावरच चोरट्याने फोडली दुकानं

Goa Market: कुळे बाजारातील यापूर्वी अनेक दुकाने शटर वाकवून फोडली, त्यांचाही तपास अजूनपर्यंत लागलेला नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Market: कुळे पोलिस स्थानकाच्या अवघ्या अंतरावर असलेल्या कुळे भर बाजारातील पाच दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्याने चोरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या पूर्वीही दुकाने फोडलेली होती, त्याचाही तपास अजूनपर्यंत लागलेला नाही.

वासुदेव गांजेकर यांचे वाईन शॉपमध्येवरील कौले काढून आत प्रवेश केला. दुकानातील 25 हजार लंपास करण्यात आले. ब्रिजेश भगत यांच्याही दुकानातील कौले काढली जास्त उंची असल्याने आत प्रवेश केला नाही. त्याच्याच बाजूला असलेल्या सर्व दुकानाची कौले काढली होती.

रामदास पाटील यांच्या हॉटेलात मात्र हा चोरटा उतरला, पण अवघेच चिल्लर हाती लागले. या दुकानात असलेल्या सिसीटिव्हीत मात्र हा चोरटा मोबाईल टॉर्चद्वारे फिरत असल्याचे दृष्टीस पडत आहे. या संदर्भात गांजेकर यांनी पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. उपनिरीक्षक अजय धुरी यांनी सीसीटीव्हीची पहाणी केली व तपास चालू केला असून संपूर्ण परिसर पिंजून काढला असल्याचे पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी यांनी सांगितले.

जलदगतीने तपास करा

कुळे बाजारातील यापूर्वी अनेक दुकाने शटर वाकवून फोडलेली होती. वेरेकर यांच्याही घरात प्रवेश करून कपाट वगैरे फोडलेले होते, याची तक्रारही त्यावेळी कुळे पोलिस स्थानकांत केली होती. त्याचाही तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. आज माझ्याही वाईन शॉपात चोरी झाली आहे. फुटेजमध्ये त्याचा फोटो मिळाला असून पोलिसांनी या चोरीचा तपास जलदगतीने करावा, अशी मागणीही वासुदेव गांजेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT