Khandepar Dainik Gomantak
गोवा

Kulem: खांडेपार कालव्यालगत अतिक्रमण केल्यास ते मोडून काढणार; मंत्री सुभाष शिरोडकरांचा इशारा

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन शिरोडकर यांनी खांडेपार कालव्याची केली तातडीने पाहणी

दैनिक गोमन्तक

Kulem: खांडेपार कालव्याच्या दोन्ही बाजूला सहा-सहा मीटर रूंद जमीन जलस्त्रोत खात्याची आहे. या ठिकाणी रस्ता तयार करण्यासाठी ही जमीन शेतकऱ्याकडून संबंधित खात्याने घेतलेली आहे. या जमिनीवर जर कोणी अतिक्रमण केलेले असेल तर ते मोडून काढणार,असा इशारा जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला.

खांडेपार कालव्यावर अवलंबित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असता ते शेतकऱ्यांशी बोलत होते. कालव्याची दुरुस्ती करूनही वरचेवर पाणी वाया जात आहे. त्यामुळे हा कालवा नव्याने बांधण्यासाठी निविदा निघालेली आहे.

कालवा दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य ने आण करण्यासाठी रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्याला सोडलेल्या जमिनीत कोणीही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळल्यास कारवाई करण्यात येईल. येत्या 1 जानेवारीपासून जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे,असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.

यावेळी कुळे शिगावचे सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सदस्य साईश नाईक, अनिकेत देसाई, बेनी आजावेदो, सदानंद बांदेकर, सोनम दहिफोडे, प्रसाद गावकर, अश्विनी नाईक देसाई, सहाय्यक अभियंता सदानंद नाईक, कनिष्ठ अभियंता सागर तसेच जलस्त्रोत्र खात्त्याचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्याअनुषंगाने आज पाहण्यासाठी आलो. हा कालवा पोर्तुगीज काळापासून आहे. कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी वाटप सोसायटी स्थापन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

धोलबाग कालव्याची ही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वाकी कुळण येथे असलेली सिंचन योजना येत्या दोन तीन महिन्यात सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले. सहायक अभियंता सदानंद नाईक यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.

11 कोटी खर्चून होणार कालवा दुरूस्ती

खांडेपार कालवा हा साडेनऊ मीटररुंदीचा असल्याने दोन टप्प्यात हा कालवा नव्याने बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 3.5 किमी अंतराच्या हा कालव्याचे काम हाती घेणार आहे.त्यासाठी 3.5 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

कालव्याच्या दुरुस्ती काळात शेतकऱ्यांना खनिज खाणीतील पाणी कालव्यात सोडण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कालव्याच्या दुरुस्तीसाठी 7.5 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT