Goa Kharif Vegetable Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Kharif Vegetable: राज्‍यात खरीप हंगामात किती हेक्टर क्षेत्रात भाज्‍यांची लागवड करण्‍यात आली आणि त्‍यातून किती उत्‍पादन मिळाले, असा प्रश्‍‍न आमदार शेट यांनी विचारला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यात खरीप हंगामात होणारे भाजीचे उत्‍पादन आणि भाजी लागवडीच्‍या क्षेत्रातही २०२३ आणि २०२४ च्‍या तुलनेत २०२५ मध्‍ये घट झाल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिसून येते.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यासंदर्भातील प्रश्‍‍न विचारला होता. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्‍या काळात राज्‍यात खरीप हंगामात किती हेक्टर क्षेत्रात भाज्‍यांची लागवड करण्‍यात आली आणि त्‍यातून किती उत्‍पादन मिळाले, असा प्रश्‍‍न आमदार शेट यांनी विचारला होता.

त्‍यावरील उत्तरात मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी जी आकडेवारी सादर केली आहे, त्‍यात २०२३ मध्‍ये ३,१०४ हेक्‍टर जमिनीत भाज्‍यांची लागवड करण्‍यात आली होती. त्‍यातून ३२,९६१ टन भाज्‍या मिळाल्‍या होत्‍या. २०२४ मध्‍ये ३,१६५ हेक्‍टरमध्‍ये भाज्‍यांची लागवड करण्‍यात आली.

उत्‍पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य

भाज्यांचे उत्‍पादन वाढविण्‍यासाठी सरकार कोणकोणत्‍या उपाययोजना राबवत आहे, असाही प्रश्‍‍न आमदार शेट यांनी विचारला होता. त्‍यावर अधिकाधिक तरुणांनी कृषी क्षेत्रात कार्यरत होऊन भाज्‍यांची लागवड करावी, यासाठी फलोत्‍पादन महामंडळामार्फत विविध योजना राबवण्‍यात येत आहे. शेतकऱ्यांना सबसिडी देण्‍यात येत आहे. भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे पाणी तसेच पिकाच्‍या संरक्षणासाठी कुंपण उभारण्यास आर्थिक मदत देण्‍यात येते, असेही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

या भाजी उत्पादनात राज्य अग्रेसर

राज्‍यात कोणकोणत्‍या भाज्‍यांचे अधिक उत्‍पादन घेण्‍यात येते, या प्रश्‍‍नाच्‍या उत्तरात राज्‍यात कारली, भेंडी, दुधी भोपळा, वांगी, मिरची, गवार, कोथिंबीर, काकडी, भोपळा, मुळा, दोडका, वाल, पालक, मेथी, शेपू, पडवळ, नवलकोल आदी भाज्‍यांचे मोठ्या प्रमाणात उत्‍पादन घेण्‍यात येत आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT