Khandepar Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Khandepar Gramsabha: गावाबाहेरील मृतदेह दफन करण्यास मज्जाव, कुर्टी ग्रामस्थांची सूचना; 'हे' आहे कारण

कुर्टी - खांडेपार ग्रामसभा : सीसीटीव्ही, गाडे प्रश्नावरून गदारोळ

गोमन्तक डिजिटल टीम

Khandepar Gramsabha कुर्टी येथे सर्वधर्मियांसाठी स्मशानभूमी बांधण्यात येत आहे. हे काम मार्गी लागले आहे. मात्र, या स्मशानभूमीचे योग्य व्यवस्थापन करताना ग्रामस्थांची एक समिती स्थापन करावी, योग्य कायदे व नियम करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

मात्र, स्मशानभूमीसाठी डोंगर कापणी व्यवस्थित झाली नसल्याचे सांगून गावाबाहेरील विशेषतः परप्रांतीय मृतदेह दफन करण्यास मज्जाव करणारी सूचना ग्रामस्थांनी मांडली.

कुर्टी - खांडेपार ग्रामसभेत रविवारी स्मशानभूमी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ओपा - खांडेपार तिठ्यावरील बसनिवारा शेड आणि गाड्यांच्या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली. गाडे प्रकरणावर गदारोळ झाला. मात्र, या विविध विषयांवर आवश्यक निर्णय घेण्यात आले. ही ग्रामसभा खांडेपार कपेल सभागृहात झाली.

सरपंच संजना नाईक यांनी स्वागत केले. या ग्रामसभेला उपसरपंच तसेच इतर पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिव सचिन यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली.

पंचायत क्षेत्रातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाल्याने ते बदलून नवीन उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सध्याचे कॅमेरे योग्य नसल्याने कचराफेकूंना पकडणे शक्य नसल्याने कचरा इतस्ततः विखुरल्याचे ग्रामस्थांनी पंचायत मंडळाच्या निदर्शनास आणून दिले.

खराब कॅमेऱ्यासंबंधी कारवाईचे काय झाले, असा सवालही ग्रामस्थांनी करून पंचायत मंडळाला जेरीस आणले. पंचायत क्षेत्रातील झुडपांच्या काटछाटीची अव्वाच्या सव्वा बिले लावल्याने यासंबंधीही कारवाई करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.

जमीन सर्वेक्षणाची मागणी

ओपा - खांडेपार तिठ्यावरील बसनिवारा शेड बांधकाम व गाडे हटवण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. ही जमीन कुणाची ते स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली.

शेवटी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाने या जमिनीचे आधी सर्वेक्षण करावे आणि मगच गाडे हटवण्यासंबंधी कार्यवाही करावी, असे ठरले. पंचायत क्षेत्रातील अंगणवाडीचे बांधकाम तसेच पावसाच्या पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली जाण्याचा प्रकार, त्याचबरोबर पार्किंग व भुयारी मार्गाचा विषयही चर्चेला आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT