CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: स्थानिकांना भडकवण्याचं काम रेती व्यावसायिकांच, मात्र पाण्यासाठी बंधारा आवश्यकच

मुख्यमंत्री सावंत: जिथे जिथे बंधारे बांधले, तिथे फायदाच झाला!

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant: मुर्डी-खांडेपार नदीवर उभारण्यात येत असलेला बंधारा गरजेचा असून त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्र्न सुटेल. त्याचप्रमाणे पाणी साठविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तेथील काही रेती व्यावसायिकांना हा बंधारा नको आहे, म्हणूनच ते स्थानिकांना भडकवित आहेत, असे मत मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांनी मडगावात एका कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

जिथे जिथे बंधारे बांधले आहेत, तिथे फायदाच झालेला आहे. जिथे बंधारे बांधले, तेथील घरे कधी पाण्याखाली आलेली नाहीत. गांजे, उसगाव येथील बंधाऱ्याची उंची वाढवली, त्याचाही फायदाच झाला, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

डिचोली येथील शाळेत जी ‘पेपेर स्प्रे’ची घटना घडली, काही मुली बेशुद्ध झाल्या, त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, सध्या चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर नेमके काय घडले ते कळेल. संबंधित विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

फेडरेशन ऑफ ऑल गोवा मल्याळी असोसिएशनतर्फे मडगावच्या रवीन्द्र भवनात ओणमनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले, की १९६१ पासून केरळमधील लोक गोव्यात आहेत.

गोव्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्वाचे ठरलेले आहे. गोवा हरित व स्वच्छ ठेवण्यासाठी बाहेरच्या राज्यातून गोव्यात येणाऱ्या नागरिकांनी योगदान द्यावे. गोव्याकडे एक प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. त्यामुळे गोव्यात ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांचे आम्ही स्वागतच करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘इफ्फी’साठी सहकार्य!

रवीन्द्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी त्यांना इफ्फीसाठी कोणती तयारी करायला हवी, कोणत्या साधनसुविधा उपलब्ध करायच्या आहेत, त्याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी तालक यांना सर्व सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim: ..तोल गेला आणि छतावरून खाली कोसळला! कुंडईतील घटना; झारखंडच्या कामगाराचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

Goa Live Updates: गोव्यात पावसाची दडी, तापमान वाढणार

Goa Weather Update: ऐन पावसाळ्‍यात कडकडीत ऊन, आठवडाभर कसं असेल हवामान हवामान? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Romi Devanagari Konkani: रोमी-देवनागरी कोकणी वादाला पूर्णविराम, लिपीच्‍या वादातून तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न - मुख्‍यमंत्री सावंत

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT