Ketan Bhatikar Dainik Gomantak
गोवा

Khandepar News: मुर्डीतल्या 144 कलमाबाबत स्थानिक आमदार अनभिज्ञ; सरकारकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न- भाटीकर

या 144 कलमासंबंधी स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांना काहीच माहिती नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Ketan Bhatikar देवदेवतांची मांदियाळी असलेल्या मुर्डी-खांडेपार भागात विनाकारण १४४ कलम लावून ग्रामस्‍थांमध्‍ये अशांतता, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकाराचा आपण निषेध करीत असल्याचे येथील मगो पक्षाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुर्डी-खांडेपार बंधाऱ्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार चालला आहे. या बंधाऱ्याला लोकांचा ठाम विरोध असतानाही अशा प्रकारचा निर्णय ऐन श्रावण महिन्यात सरकारने घेतल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे या १४४ कलमासंबंधी स्थानिक आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांना काहीच माहिती नाही. सरकारचा घटक असूनही एका ज्येष्ठ मंत्र्याला सरकार विश्‍वासात घेत नाही असे आम्ही समजायचे काय? असा सवाल करून लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार त्‍वरित बंद करा, असे भाटीकर म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात मुर्डी-खांडेपार भागातील काही लोक बेघर झाले होते. त्यावेळी आम्ही मगो पक्षामार्फत मदतकार्य केले. काहीची घरे बांधून दिली. त्या लोकांना आता बंधारा बांधल्यावर महापुराचा फटका निश्‍चितच बसेल, असे भाटीकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT