Karnataka Bus Accident At Goa:  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Bus Accident At Goa: चालकाच्या डुलकीने झाला अपघात, आगशी वळणावर बस कलंडली

आगशी उड्डाणपुलावरील घटना : प्रवासी थोडक्यात बचावले

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Bus Accident At Goa राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून आगशी उड्डाणपुलावर आंतरराज्य बसला पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बसचालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि एका तीव्र वळणावर बस कलंडली.

सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. आगशी पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.

केए-०१-एजे-२४६२ या क्रमांकाची बस बंगळुरू ते पणजी असा प्रवास करत होती. सीबर्ड कंपनीची ही बस आज पहाटे मडगावहून सुटल्यानंतर शेवटचा थांबा घेण्यासाठी जात असताना नवीन झुआरी पुलाच्या आगशी येथील उड्डाण पुलावरून सर्व्हिस रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करताना डुलकी लागल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला.

ही बस डाव्या बाजूला कलंडली. अपघातावेळी बसमध्ये १८ प्रवासी होते. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास हवालदार उदय पालकर करत आहेत.

चालकाची केली मद्यचाचणी

सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला या अपघाताची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून त्यांनी पंचनामा केला. बस अतिवेगाने वळण घेत असल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बसचालकाने मद्यपान केले होते का, हे तपासण्यासाठी आगशी पोलिसांनी त्याची गोमेकॉत तपासणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT