Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Goa Kadamba Transport: कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला 15 दिवस पूर्ण; सरकार अजूनही दखल घेईना

Goa Kadamba Transport: या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

Ganeshprasad Gogate

Goa Kadamba Transport: कदंब चालक आणि कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आयटक या कागमार संघटनेच्या अध्यक्षतेखाली आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले आहे.

कदंब महामंडळाने सातव्या वेतन आयोग लागू केला तरी अजून त्याबाबत करार केला नाही. तो त्वरित करणे आवश्यक आहे. अशा अनेक मागण्या मंडळासमोर ठेऊन कामगारांनी आंदोलन सुरु केलं होता.

कदंब वाहतूक महामंडळाच्या चालक आणि संलग्न कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला 15 दिवस काल पूर्ण झाले, तरी देखील सरकारी यंत्रणेने या साखळी उपोषणाची - अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही.

दरम्यान, या संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत साखळी उपोषण तीव्र करण्याचा निर्णय काल घेण्यात आला.

या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधितांनी प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन सुध्दा त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कृती केली नसल्याने अखेर बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या बेमुदत साखळी उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कामगार संघटनेने यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांच्या कदंब डेपो - स्तरावर बैठक घेण्याचे ठरविण्यात आले असून, कदंब कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर पसरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व मतदारसंघातील आमदारांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रलंबित प्रश्न मांडून पाठिंबा मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आझाद मैदानावर बेमुदत साखळी न उपोषणात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहभागी करून घेण्याचा निर्णय बैठकीत न घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT