Alcohol Consumption in Goa Dainik Gomantak
गोवा

'सोरो जिवाक बरो'; मद्यप्राशनाच्या बाबतीत गोवा अव्वलस्‍थानी

59 टक्के लोकांना मद्याचे आकर्षण; दारुच्या सेवनात गोवेकरांचा वरचष्मा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विक्रमी मद्यविक्री होते. यामागे पर्यटन आणि कॅसिनोसारखे अतिथींना खेचणारे व्यवसाय असतात, असा सार्वत्रिक समज. पण खुद्द गोंयकारांचा मद्यसेवनातला टक्काही भलताच चढा आहे. किंबहुना अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातला पुरुषवर्ग सर्वाधिक दारु ढोसत असतो. ताज्या राष्ट्रीय परिवार आरोग्य सर्वेक्षणाची आकडेवारी सांगते, 15 ते 49 या वयोगटातील 59 टक्के गोमंतकीय मद्यसेवन करतात. हे प्रमाण देशात गोव्याला अव्वलस्थानी घेऊन गेले आहे.

गोव्यातील महिला मात्र याबाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा (की ग्लासाला ग्लास) लावण्याच्या विचारात नाहीत, असे दिसते. तो मान सुदूर ईशान्येकडे असलेल्या अरुणाचल प्रदेशाला गेला असून तिथल्या 17 टक्के महिला मद्यप्राशन करतात. दुसऱ्या स्थानी आहे सिक्कीम (14.8%) आणि तिसऱ्या स्थानी आहे आसाम (5.5%). तर 4.8 टक्क्यांसह गोवा चौथ्या स्थानावर आहे. अर्थांत याआधी झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीशी तुलना करता मद्यप्रेमी भगिनींचे प्रमाण कमी होत आहे. दरम्‍यान, अरुणाचल प्रदेशचा पुरुषवर्गही गोव्याच्या तोडीचा मद्यप्रेमी आहे. तेथे 57% पुरुष मद्यप्राशन करतात.

गोव्याच्या ग्रामीण भागात अधिक मद्यपी आढळतात. गावांतले प्रमाण आहे 61 टक्के तर शहरांत ते आहे 58टक्के. हा अहवाल सांगतो, महिला वर्गांत मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाण अनुसूचित जमातींत अधिक आहे. पुरुषांमध्ये शाळा अर्ध्यावरच सोडणाऱ्यांमध्‍ये हे प्रमाण अधिक असल्याची नोंद अहवाल करतो. जे 60 टक्के गोमंतकीय मद्य चाखतात, त्यातील 35 टक्के सप्ताहातून किमान एकदा तरी पितात. तर, जवळजवळ अर्धे एका मैफिलीनंतर दुसरी साजरी करण्यासाठी सप्ताहातून अधिक काळ लावतात.

या आधीच्या सर्वेक्षणात गोमंतकीय मद्यप्रेमींचे प्रमाण 37 टक्के इतके होते. आता ते 22 टक्क्यांनी वाढले आहे. युवक आणि कुमारवयीनांतले वाढते मद्यप्रेम यामागचे कारण आहे. राज्यातील सुखवस्तू परिवारांचे प्रमाणही अधिक असून मद्यसेवनाकडे गोव्यात वर्ज्य व्यसन म्हणून पाहिले जात नाही, असे मत पणजीतील डॉ. सर्वेश महाले यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT