Goa is first state in country to launch telemedicine service Dainik Gomantak
गोवा

टेलिमेडिसीन सेवेचा प्रारंभ करणारे गोवा देशातील पहिले राज्‍य

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालये ही जीएमसीमधील अ‍ॅपेक्स टेलीमेडिसीन सेवेला जोडली जाणार आहेत,

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील (Goa) दुर्गम भागासह सर्वांना फायदेशीर ठरणाऱ्या टेलिमेडिसीन सेवेचा (Telemedicine Service) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काल प्रारंभ केला. राज्य सरकारचा (Goa Government) आरोग्य विभाग आणि मेडिको एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आकारास येणार असून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय या सेवेमार्फत अ‍ॅपेक्स रुग्णालयाला जोडली जाणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर गडकरी म्हणाले, कोविडसारख्या जागतिक महामारीने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रमाणात अनेक संधीही निर्माण झाल्या आहेत. आरोग्य सेवांमध्‍ये खूपच गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले असून ताण वाढत आहे. प्रत्यक्ष रुग्णांना हाताळणे कठीण बनले आहे.

अशा वेळी टेलिमेडिसीन सेवा फायदेशीर ठरत असल्याचे लक्षात आल्यावर ही योजना तयार झाली. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अत्यावश्यक सेवा गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे होते. त्‍यावेळी मेडिको एक्स्पर्टसने हे अवघड काम सोपे केले. विदर्भात ही सेवा यशस्वीपणे सुरू केली. याच धर्तीवर देशात गोव्यात प्रथमच सुरू होत आहे. हे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे त्याचा उपयोग करून सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिक सुखकर केले पाहिजे.

टेलिमेडिसीन सेवा म्हणजे काय?

प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपजिल्हा रुग्णालये ही जीएमसीमधील अ‍ॅपेक्स टेलीमेडिसीन सेवेला जोडली जाणार आहेत, ज्यामुळे जीएमसीमधील तज्‍ज्ञ डॉक्टर इतर रुग्णालयांतील कनिष्ठ डॉक्टरांना वैद्यकीय सल्ला देऊ शकतील. शिवाय राज्यातील नागरिकही या सेवेचा फायदा घेऊ शकतात. रुग्णाला रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. घरी बसून तो वैद्यकीय सल्ला, औषधोपचार घेऊ शकतो. तसेच रुग्णाला देशभरातील तज्‍ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT