कणकुंबी येथे प्रवाशी तपासणी (Goa) गोमन्तक फोटो सेवा
गोवा

Goa: कणकुंबीत प्रवाशांची covid 19 तपासणी सुरू

आरटीपीसीआर, (RTPCR Covid test ) करोना लसीकरणाचा (covid vaccination) दाखला बंधनकारक

Sanjay Ghugretkar

पणजी (प्रतिनिधी) ः बेळगांव जिल्ह्यालगत असणाऱ्या गोवा (Goa) आणि महाराष्ट्र राज्यात डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण (Covid test) आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबी विश्रामगृहा समोर तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आली आहे. चोर्लामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

मागील आठवडाभरापासून खानापूर तालुक्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. कोरोना संक्रमणापासून पूर्णपणे सुरक्षित असलेल्या तालुक्याला तिसऱ्या लाटेचा कोणताही धोका उद्‍भवू नये. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कणकुंबी येथे गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दिवस-रात्र पोलीस, महसूल,पंचायत व आरोग्य खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


ट्रक, बसेस, दुचाकी, चारचाकी आदी वाहनातून येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी व चौकशीला केली जात आहे. आशा कार्यकर्त्यांकडून थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. तर अहवाल तपासणीसाठी महसूल विभागाचे तलाठी कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT