गोव्यात अमली पदार्थांचे वाढते जाळे हे केवळ वैयक्तिक आयुष्यच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी घातक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. अमली पदार्थांचे व्यसन युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करते, कुटुंबांना संकटात टाकते आणि सामाजिक रचनेला सुरुंग लावते असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना गोव्याची खरी ताकद असलेले युवक या विळख्यात अडकू नयेत, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोवा सरकारने ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. याअंतर्गत कायदे अधिक कठोर करण्यात आले असून, पोलीस यंत्रणेचे पाळत वाढवण्यात आली आहे.
राज्यात कार्यरत असलेल्या ड्रग नेटवर्क्सवर सातत्याने कारवाई सुरू असून, पुरवठा साखळी तोडण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत.केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांशी समन्वय अधिक मजबूत करण्यात आला असून, संयुक्त कारवाईद्वारे आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करी रोखण्यावर भर दिला जात आहे.
यासोबतच, शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिली जात आहे. ड्रग्समुक्त गोवा घडवण्यासाठी सरकार, प्रशासन, पालक आणि समाजाने एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.