Chennai to Goa IndiGo Flight Bomb Threat Dainik Gomantak
गोवा

Flight Bomb Threat: गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी; प्रवाशांना उतरवले, उड्डाणाला 5 तास विलंब

Chennai Goa Flight Delayed After Bomb Threat: चेन्नईहून गोव्याला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने सोमवारी चेन्नई विमानतळावर एकच खळबळ उडाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चेन्नईहून गोव्याला येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने सोमवारी चेन्नई विमानतळावर एकच खळबळ उडाली. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवून विमान स्वतंत्र विलगीकरण क्षेत्रात नेण्यात आले.

सुरक्षा यंत्रणांनी कसून तपासणी केल्यानंतर रात्री ९.२० वाजता सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाली. या घटनेमुळे गोव्याला येणाऱ्या प्रवाशांना सुमारे पाच तास विलंबाचा सामना करावा लागला. इंडिगोचे ६-ई-५८८ क्रमांकाचे विमान सोमवारी सायंकाळी ५.४० वाजता चेन्नईहून गोव्याकडे रवाना होणार होते. मात्र, विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर तत्काळ बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीची बैठक घेण्यात आली.

समितीने सायंकाळी ६.०५ वाजता धमकी गंभीर स्वरूपाची असल्याचे घोषित केले. त्यानंतर विमान टर्मिनल आणि अन्य विमानांपासून दूर असलेल्या स्वतंत्र विलगीकरण क्षेत्रात हलविण्यात आले. सायंकाळी ६.५५ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. त्यानंतर सुरक्षा पथकांनी निर्धारित प्रक्रियेनुसार विमानाची स्फोटकविरोधी तपासणी केली.

सुरक्षा प्रक्रियेनंतर विमान गोव्याकडे

तपासणी आणि आवश्यक सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री ९.२० वाजता विमान पुन्हा इंडिगोच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले. नियोजित उड्डाणाची वेळ आणि सुरक्षा प्रक्रिया पूर्ण होण्याची वेळ यांमध्ये तीन तास ४० मिनिटांचे अंतर होते. प्रत्यक्ष उड्डाणापूर्वीच्या अन्य प्रक्रियांमुळे विमानाला सुमारे पाच तास विलंब झाला.

Panaji Theft Case: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ! पार्क केलेल्या कारची काच फोडून 'इतक्या' हजारांच्या रोकडसह PMLA खटल्यांचे पुरावे लंपास

Electric Scooter Fire Betim: चार्जिंगला लावलेली ईव्ही दुचाकी अचानक पेटली; कार आणि बुलेटचेही लाखोंचे नुकसान!

SBI Cyber Attack: देशातील सर्वात मोठ्या बँकेवर सायबर हल्ला! 3897 ग्राहकांचा प्रायव्हेट डेटा डार्क वेबवर लीक; तुमचा डेटा सुरक्षित आहे का?

Goa Pharma Export Hub: गोवा बनणार औषध निर्यातीचे नवे केंद्र? मोपा-दाबोळी विमानतळांवर मोठी तयारी!

Congress Rakhan Yatra: काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून काय साध्य झाले? 27 दिवसांच्या प्रवासानंतरही अनुत्तरित प्रश्न कायम

SCROLL FOR NEXT