Budget 2024 Dainik Gomantak
गोवा

Budget 2024: देशात ‘अच्छे दिन' ऐवजी धर्मावरून फूट पाडण्यात सरकार व्यस्त; यंदाचा अर्थसंकल्प एक ‘जुमला’- पणजीकर

Goa Congress: यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षांप्रमाणेच एक ‘जुमला’, लोकहिताची कामे करण्यात मोदी सरकार अपयशी - पणजीकर

Ganeshprasad Gogate

Goa Congress: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (1 फेब्रुवारी) वर्षभराच्या खर्चाचं नियोजन किंवा आराखडा दाखवणारा अर्थ संकल्प सादर केला असून यावरून गोव्यात टीकास्त्र डागले गेले आहे.

यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षांप्रमाणेच आणखी एक ‘जुमला’ आहे, जिथे केवळ आश्वासने दिली जातात आणि ती कधीच पूर्ण केली जात नाहीत, असे म्हणत काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकर यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

भारताचे एकूण कर्ज 205 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असताना, नरेंद्र मोदी सरकार गेल्या दहा वर्षांत गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या हितासाठी काम करण्यात अपयशी ठरले आहे. अर्थमंत्री निर्मल सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात हे दिसून आले आहे.

यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षांप्रमाणेच आणखी एक ‘जुमला’ आहे, जिथे केवळ आश्वासने दिली जातात आणि ती कधीच पूर्ण केली जात नाहीत.

अर्थमंत्री निर्मल सीतारामण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचे कौतुक करण्याऐवजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपच्या नेत्यांनी मागील अर्थसंकल्पातील अपयशाबद्दल बोलावे.

अर्थसंकल्पात 18 लाख कोटी रुपयांची तूट आहे. हे चिंताजनक नाही का? यावरून हे सिद्ध होते की सरकार आपल्या खर्चासाठी कर्ज घेत आहे आणि महसुली उत्पन्नासाठी काहीही करत नाही.

हे 'जुमला' सरकार असल्याचे या अर्थसंकल्पातून सिद्ध पुन्हा सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदी सरकारने 2014 मध्ये दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ? असे आश्वासन दिले होते.

ते पूर्ण झाले आहे का? मला असे वाटते की अर्थसंकल्प केवळ एक नित्य प्रशासकीय प्रक्रिया आहे. सरकार काहीतरी करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. पण ते काहीच करत नाही.

मोदी सरकारसमोर आर्थिक स्थैर्य आणि जनतेला ‘अच्छे दिन उपलब्ध करून देण्याची मोठी आव्हाने आहेत. मात्र या आव्हानांना तोंड देण्याऐवजी भाजप नेते धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्यात व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT