Health Minister Vishwajit Rane inaugurated the Mhalchi Pandhari Multipurpose Society at Bhuipal. (Goa)
Health Minister Vishwajit Rane inaugurated the Mhalchi Pandhari Multipurpose Society at Bhuipal. (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: भुईपाल येथे म्हांलची पांढरी मल्टिपर्पज संस्थेचे उद्घाटन

Dainik Gomantak

पिसुर्ले: भुईपाल, पिसुर्ले, कुभांरखण, सालेली व होंडा या भागातील नागरिकांनी (Citizens of Bhuipal, Pisurlem, Kumbharkhan, Salelim, Honda) एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या म्हांलची पांढरी मल्टिपर्पज सहकारी संस्थेचे (Mhalchi Pandhari Multipurpose Society) काल दि 15 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwjit Rane) यांच्या हस्ते उद्घाटन (inauguration) करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सदर भागातील युवकांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, सदर संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेच्या कार्यात पारदर्शकता ठेऊन नागरिकांना चांगली सेवा द्यावी, त्याच प्रमाणे सहकार खात्यातर्फे मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन महीला वर्गाला सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, संस्थेच्या प्रगतीसाठी आपल्या कडून सदैव सहकार्य मिळेल असेही मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले. (Goa)

या प्रसंगी व्यासपीठावर होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्या राजेश्री काळे, होंडा सरपंच आत्मा गावकर, सहकार खात्याचे साह्यक निबंधक पंकज मराठे, स्थानिक पंच सदस्य सया पावणे, पांडुरंग गावकर, शिवदास माडकर, विक्रांत देसाई, वरिष्ठ लेखाधिकारी सतिश सांवत, संस्थेचे चेअरमन बि डी मोटे, सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहकार खात्याचे साह्यक निबंधक पंकज मराठे यांनी, सहकार क्षेत्रा विषयी माहिती देऊन कायदेशीर बाबी पूर्ण करून संस्थेची वाटचाल सुरू ठेवावी, संचालक मंडळाला मार्गदर्शनाची गरज पडल्यास अवश्य संपर्क साधावा असे आवाहन केले.

या भागातील युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थेचे निश्चितच प्रगती होईल, त्याप्रमाणे धमक या भागातील युवकां मध्ये आहे, त्यांच्यानी समाज कार्याच्या माध्यमातून कार्य करीत असताना सहकार क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे असे उद्गार होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी व्यक्त केले. नगरगाव जिल्हा पंचायत सदस्या राजेश्री काळे हीने संस्थेच्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करून सहकार्य देण्याची ग्वाही दिली. सुरवातीस आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते फित व समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले, संस्थेचे चेअरमन बि डी मोटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक गंगाराम वरक तर भैरू झोरे यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT