Goa Rain Forecast | IMD Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Forecast: राज्यात गडगडाटी पावसाचा गोवा वेधशाळेचा अंदाज

काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Rain Forecast: जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये मॉन्सूनला सुरवात होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर देशातील वातावरणात बदल घडून येताना दिसत आहेत.

गोव्यातही गेल्या काही दिवसांत पावसाचे वातावरण होत असून राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरीही लावली आहे. 23 आणि 24 मे रोजी देखील गडगडाची पावसाचा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

(IMD Goa)

सोमवारी संध्याकाळी तसेच रात्री गोव्यातील सत्तरी, पणजी परिसरात वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती मंगळवारी 23 मे रोजी असू शकते, असे या अंदाजात म्हटले आहे.

वादळी पावसासह वीजांचा कडकडाट असेल तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल, असेही आयएमडीने म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी 24 मे रोजी राज्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडेल, असेही आयएमडीने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT