Chirekhan  Dainik Gomantak
गोवा

Goa Mines: नार्वेत बेकायदा चिरेखाणीवर छापा

Goa Mines: यंत्रसामग्री जप्त: खाण खात्याची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mines: खाण आणि भूगर्भ खात्याने केलेल्या एका कारवाईत नार्वे गावातील देवगळी परिसरात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या एका चिरेखाणीवर छापा मारला.

या छाप्यावेळी अधिकाऱ्यांनी चिरेखाणीवरील यंत्रसामग्री जप्त केली. या कारवाईमुळे चिरे काढणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली यंत्रसामग्री सध्या पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. या बेकायदा व्यवसाय प्रकरणी मात्र कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे समजते.

नार्वेतील देवगळी परिसरात बेकायदेशीरपणे चिरे खाण चालत असल्याची तक्रार येताच खाण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक एका मोठ्या खाणीवर छापा टाकला.

यावेळी चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच खाणीवर बसविण्यात आलेले जनरेटर जप्त करण्यात आले.

नार्वेत मोठ्या प्रमाणात चिरेखाणी:-

नार्वे गावातील देवगळी परिसरात कोमुनिदादच्या जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे चिरेखाणी चालत आहेत. चिरेखाणींमुळे देवगळी परिसर तर पुरता पोखरला गेला आहे. स्थानिकांसह गावाबाहेरील काहीजण या व्यवसायात आहेत.

यापूर्वीही या नार्वे गावातील चिरेखाणीवर कारवाई करण्यात आली आहे. तर या बेकायदा प्रकाराची दखल घेत नार्वे कोमुनिदादला दंडही ठोठावण्यात आला होता.

तरीदेखील या बेकायदा चिरेखाणी बंद झालेल्या नाहीत. कारवाई झाली, की काही दिवस चिरेखाणी बंद असतात. नंतर पुन्हा चिरेखाणीचा व्यवसाय जोरात सुरू होत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT