Goa Illegal Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Shacks: आणखी 15 शॅक्सवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; शॅक्स बंद करण्याचे निर्देश

आता मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सवर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Illegal Shacks: उच्च न्यायालयाने घेतलेल्या या गंभीर दखलीमुळे शॅक्सचालकांना दणका बसला आहे. इतर समुद्रकिनारीही असलेल्या शॅक्सचालकांची तपासणी करण्याचे निर्देश पर्यटन खाते व जीसीझेडएमएला दिल्याने इतर शॅक्सचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ज्या 161 शॅक्सचा व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी उत्तर गोवा जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यातच अजून 15 शॅक्सवर कारवाई करण्यात आली आहे.

आता मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सवर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या किनाऱ्यावरील एकूण 15 शॅक्स आणि रिसॉर्ट प्रदूषण परवाने नसल्याने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, बंद करण्यात आलेले शॅक्स सुरू होणार नाहीत याची जबाबदारी जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. ज्यांनी मंडळाकडून संमती परवाना मिळविला आहे त्याचीही तपासणी केली जावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने पर्यटन खात्याला दिले आहेत.

या शॅक्सचालकांनी आदेशाचे पालन केले आहे की नाही व संमती परवान्यासाठी केलेल्या अर्जांची माहिती व त्यावर घेतलेल्या निर्णयासंदर्भातचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT