Illegal Massage Parlour Dainik Gomantak
गोवा

राज्यात केवळ 166 मसाज पार्लरचीच नोंदणी!

‘अर्ज’ संस्थेची माहिती : दहा वर्षांत पाच पार्लरांना परवाना

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात केवळ 166 स्पा-मसाज पार्लर हे नोंदणीकृत आहेत. गेल्या दहा वर्षात पाच मसाज पार्लरचा परवाना रद्द केला गेला आहे. हे परवाने मसाज पार्लरच्या मालकांनी स्वतः अर्ज करून रद्द करवून घेतले आहेत. परंतु गेल्या दहा वर्षात, बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याच्या कारणाने एकही मसाज पार्लर बंद झालेला नाही, अशी माहिती ‘अर्ज’ या संस्थेने माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळवली आहे.

अर्ज (अन्याय रहित जिंदगी) ही स्वयंसेवी संस्था 1998 पासून व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणाऱ्या मानवी तस्करीविरोधात काम करते. त्याशिवाय ही संस्था लैंगिक शोषणातून सुटका करून राज्याच्या संरक्षणात असलेल्या महिला आणि मुलींना पुनर्वसन सेवाही पुरवते. मसाज पार्लरवर छापा टाकताना पोलिसांना ‘अर्ज’ वेळोवेळी साहाय्य करते.

‘अर्ज’ च्या माहितीनुसार, बहुतेक मसाज पार्लर आरोग्यविषयक अनिवार्य असलेल्या नियमांचे पालन अजिबात करत नाहीत. ‘अर्ज’च्या निरीक्षणानुसार गोव्यातले स्पा आणि मसाज पार्लर हे व्यावसायिक लैंगिक शोषणाचे आणि खंडणी उकळण्याचे अड्डे बनले आहेत. गोवा तसेच भारताच्या विविध भागातून- मणिपूर, नागालँड, मिझोराम, पश्चिम बंगाल तसेच नेपाळ, थायलंड या देशातून तस्करी करून त्यांना पार्लरमधून कामासाठी वापरले जात होते.

पीडितेचा जबाब बहुतेक वेळा असा असतो..

  • मालकांनी क्रॉस-मसाज करण्यासाठी जबरदस्ती केली.

  • मालकांनी त्यांना गिऱ्हाइकांशी व्यावसायिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.

  • मसाज पार्लरच्या बाहेर जाऊन गिऱ्हाईकांना मसाज सेवा देण्यासाठी त्यांना पाठवले गेले होते.

  • त्यांचा पासपोर्ट मसाज मालकांनी स्वतःकडे ठेवून त्यांना काम करण्यास लावले होते.

  • गिऱ्हाईकांच्या अत्याचारांची वाच्यता पोलिसांकडे करण्यास मनाई केली होती.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

मुख्यमंत्र्यांनी मसाज पार्लरविरुद्ध जी कडक भूमिका सध्या स्वीकारली आहे, त्याचे ‘अर्ज’ने स्वागत केले आहे, अशा अवैध कृत्यात गुंतलेले पार्लर आणि स्पा बंद करून गुन्हेगारांना त्या परिसरात मज्जाव करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT