Goa News | Iffi Festival Goa 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'इफ्फी'साठी इन्स्ट्रुमेंट अँड फिल्म पिकॉक थीम!

Goa News: विनायक डेकोरेटरचे दोनशेहून अधिक कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: 18 वर्षांपासून आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची संकल्पना व थीम दरवर्षी विविध विषयांवर आधारित असते. यंदा संगीत वाद्य व चित्रपटातील मोर (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अँड फिल्म पिकॉक) ही संकल्पना आहे. ही संकल्पना राज्यभर साकारण्यासाठी विनायक डेकोरेटरचे दोनशेहून अधिक कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत.

राज्याची कला आणि संस्कृती, कलात्मक अविष्काराच्या रुपात साकारण्यात ‘विनायक डेकोरेटर’चे प्रोफायटर सिद्धेश देसाई अग्रगण्य आहे. यंदा प्रथमच सिद्धेशला मुख्य आणि रस्त्यावरील डेकोरच्या निविदा मिळाल्या आहेत. अर्थात सिद्धेश गेल्या तीन वर्षांपासून हे काम करत आहे. मात्र, मागील वर्षी त्यांनी केवळ मुख्य डेकोरचे काम केले होते.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दर्जा कायम टिकवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या विषयाची थीम आणि संकल्पना वेगळी सादर करावी लागते. गेल्या तीन वर्षांपासून ‘विनायक’ हे काम करत आहे. मागील वर्षी रियालिस्टिक पीकॉक डेकोर सादर केले होते. तर त्यापूर्वीच्या वर्षी एलपीनो पीकॉक साकारण्यात आला होता. यंदा मात्र अत्यंत वेगळा संगीताच्या वाद्यांवर आधारलेला मोर साकारण्यात आला आहे.

अत्यंत सुबक आणि देखणी संकल्पना यंदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या सेलिब्रिटी आणि प्रतिनिधींना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. यंदा प्रथमच अनेक प्रकारचे प्रयोग राबवण्यात येत असून या डेकोरच्या सेलिब्रिटी आणि प्रतिनिधींना अनुभवही घेता येणार आहे.

यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून दीडशे कारागीर कार्यरत आहेत. आता कोलकाताहुन 41 कारागिरांची नवी टीम दाखल झाली आहे. सोमवारपासून हा नवा डेकोर साकारण्यासाठी सुमारे 300 जण कष्ट घेणार आहेत, अशी माहिती सिद्धेश देसाई यांनी दिली आहे.

26, 27 ला गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन: यंदा गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने मनोरंजन ग्राम साकारण्यात येत आहे. इफ्फीच्या काळात आठ दिवस हे स्थानिकांसाठी खुले असेल. येथे दर दिवशी नवीन सेलिब्रिटीच्या उपस्थित कार्यक्रम होतील. यामध्ये गोव्याच्या कला आणि संस्कृतीचेही दर्शन घडेल. 26 व 27 नोव्हेंबर रोजी गोव्याचे मुख्य उत्सव असणारे कार्निव्हल आणि शिगमोत्सवाची फ्लोट रॅली काढण्यात येणार आहे.

सिद्धेश देसाई, (प्रो.) विनायक डेकोरेटर-

मी तीन वर्षे हा डेकोर साकारत असलो तरी प्रत्येक वर्षीची संकल्पना वेगळी असते. त्यामुळे संपूर्ण डेकोर नव्याने साकार करावा लागतो. यंदाही तो अधिक चांगल्या रीतीने सुबक रीतीने साकारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पनेचा आम्हाला फायदा झाला असून यंदाचा डेकोर सेलिब्रिटी, प्रतिनिधी पासून गोवेकरांच्याही पसंतीला पडेल याची खात्री आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT