पालिकेचा दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा उघड्यावर, टाकल्याने जलस्त्रोत प्रदुषीत होत आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: उघड्यावरील कचऱ्यावर कारवाई न केल्यास आंदोलन करु

पावसात भिजून कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त जवळच्या जलस्त्रोतात वाहून पाणी प्रदुषीत केले जाते. यावर पालिकेने त्वरीत कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आगोंद पंचायतीचे सरपंच बादल नाईक गावकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण पालिकेचा (Kankon Palika) दुमाणे येथील कचरा प्रक्रिया (Waste processing) प्रकल्पातील कचरा उघड्यावर असल्याने पावसात भिजून कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त जवळच्या जलस्त्रोतात (water source) वाहून पाणी प्रदुषीत केले जाते. त्यासंदर्भात पालिकेने त्वरीत कारवाई न केल्यास आंदोलन (Movement) छेडण्याचा इशारा आगोंद पंचायतीचे सरपंच बादल नाईक गावकर यांनी दिला आहे.पालिकेने दुमाणे येथील कचऱ्यावर आच्छादन टाकल्याचा दाव हल्लीच केला होते सस्पशेल फोल असल्याचे दिसून आले आहे.गेल्यावर्षी पंचायतीने या कचऱ्याच्या पाण्यामुळे जलस्त्रोत प्रदूषीत होत असल्याची तक्रार आगोंद पंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती असे तत्कालीन सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी सांगितले.

गोंयकार संघटनेचा इशारा

काणकोण पालिकेला कचरा संकलन व वर्गीकरण करण्यास काही वर्षे सक्रिय सहकार्य केले होते.आता गोंयकार संघटनने कचरा व्यवस्थापनात हयगय केल्याप्रकरणी व कचऱ्याचे दुर्गंधीयुक्त पाणी जलस्त्रोतात जाऊन जलस्त्रोत प्रदुषीत होत असल्याबद्दल हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे गोंयकार संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडीस यांनी सांगितले.

जलस्त्रोत प्रदूषीत होणे हे धोकादायक

दूमाणे येथील पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील दुर्गंधीयुक्त पाणी येथील शेतीत व जलस्त्रोतात जाणे येथील जलस्त्रोत प्रदूषीत होण्यास कारणीभूत ठरणार आहे.त्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्याना त्वरीत पहाणी करून उपाययोजना करण्याची सूचना केली असल्याचे आमदार व उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी सांगितले.सद्या पक्ष व वनमहामंडळाच्या बैठका असल्याने पणजीत आहे दोन-तीन दिवसांत प्रत्यक्ष या प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन पहाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT