I-League 2 Football Dainik Gomantak
गोवा

I-League 2 Football: ‘सुपर सब’ लक्ष्मणरावरचा गोल धेंपोसाठी निर्णायक

I-League 2 Football : स्पोर्टिंग क्लब बंगळूरवर एका गोलने निसटती मात

किशोर पेटकर

I-League 2 Football: बदली खेळाडू (सुपर सब) लक्ष्मणराव राणे याने सामन्यातील दहा मिनिटे बाकी असताना नोंदविलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग 2 फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. माजी आय-लीग विजेत्या संघाने स्पोर्टिंग क्लब बंगळूरवर 1-0 अशी निसटती मात केली.

सामना गुरुवारी एला-जुने गोवे येथील मैदानावर झाला. उत्तरार्धात ६९व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात आलेल्या लक्ष्मणराव याने ८०व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबला पहिल्या विजयाची नोंद करता आली.

त्यापूर्वी, ७४व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे शानिद वालन याला रेड कार्ड मिळाले होते व स्पोर्टिंग क्लब बंगळूरला बाकी कालावधीत दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

धेंपो क्लबचे आता तीन लढतीतून चार गुण झाले आहेत. स्पोर्टिंग क्लब बंगळूरचा हा दुसरा पराभव असून त्यांचे तीन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले आहेत.

धेंपो क्लबचा पुढील सामना ८ फेब्रुवारीला केंकरे एफसीविरुद्ध होईल.स्पर्धेतील अन्य एका लढतीत खारगर येथे ऑरेंज एफसीने सुदेवा दिल्ली एफसीला ३-० फरकाने नमविले.

प्रत्येकी तीन सामने खेळल्यानंतर ऑरेंज एफसीचे पहिल्या विजयासह चार गुण झाले असून पराभवामुळे सुदेवा दिल्लीचे चार गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT