Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: 'कोलवाळ' प्रकरणी नोटिसा जारी! अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड न करण्याची तंबी; कैद्यांमधून संताप व्यक्त

Colvale Jail Crime News: कोलवाळ कारागृहातील दवाखान्याच्या विभागात एका कैद्याने छळाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेची गोवा मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोलवाळ कारागृहातील दवाखान्याच्या विभागात एका कैद्याने छळाला कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेची गोवा मानवाधिकार आयोगाने स्वेच्छा दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी व कारागृह महानिरीक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत.

या घटनेची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल १० डिसेंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू असलेल्या कैद्याची प्रकृती गंभीर आहे.

बलात्काराच्या प्रकरणातील कैदी राजू दास याने इतर कैद्यांच्या तसेच तुरुंग अधिकाऱ्यांच्या सतावणुकीला कंटाळून सॅनिटायझर प्राशन करून तसेच अंगावर छिंपडून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत तो सुमारे ५० टक्के भाजला आहे. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून तो जबानी देण्यास सुस्थितीत नसल्याने डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. जखमी कैदी दास याला उपचारासाठी म्हापसा इस्पितळात उशीर झाला होता. तेथील कारागृह अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून त्याला इस्पितळात नेण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणाची माहिती उघड न करण्याची तंबी तेथील कैद्यांना तसेच सुरक्षारक्षकांना देण्यात आली आहे.

कैद्यांमधून संताप व्यक्त

याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांनी राजू दासवर वेळीच उपचाराची सोय न केल्याने काही कैद्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांविरुद्धच तक्रारी दाखल करण्यासाठी कैद्यांचा एक गट सक्रिय झाला आहे. कारागृह अधिकाऱ्यांकडून कैद्यांचा छळ होत असून त्याची तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा त्यांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! CM सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT