Dainik Gomantak
गोवा

Goa HSC Result 2021: मडगावच्या विज्ञान शाळेचा 100 टक्के निकाल

मठग्रामस्थ हिंदू सभा संचालित मडगाव येथील श्री दामोदर उच्च माध्यमिक विज्ञान शाळेचा यंदा बारावीचा निकाल (HSC Result) 100 टक्के

दैनिक गोमन्तक

मडगाव : मठग्रामस्थ हिंदू सभा संचालित मडगाव येथील श्री दामोदर उच्च माध्यमिक विज्ञान शाळेचा यंदा बारावीचा निकाल (HSC Result) 100 टक्के लागला. त्यांचे 254 पैकी 254 विद्यार्थी (Students) उत्तिर्ण झाले. त्यातिल 136 विशेष प्राविण्य व 116 प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले. 11 विद्यार्थ्यांना (Students) 90 पेक्षा जास्त टक्के गुण मिळाले. आदिती विवेकानंद सावंत ही विद्यार्थिनी 95.33 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम आली. स्मितल चंद्रहास देसाई व वेदांग राजन बाळे यांना प्रत्येकी 94.83 गुण मिळाले. श्रवण ज्ञानेश्र्वर फडते यास 93.17 टक्के गुण मिळाले.

स्मितल देसाईस मराठी मध्ये 100 पैकी 100 व वेदांग बाळेस हिंदीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. इंग्रजी विषयात आदिती, जोशवेल फर्नांडिस व वारसी एन नाईक यांना सर्वाधिक प्रत्येकी 96 गुण मिळाले. स्मितल देसाईस भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांत सर्वाधिक 286 तर वेदांग उर्फ इशान बाळे यास भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयात सर्वांधिक 286 गुण मिळाले. वेदांगला गणितात 99, आदितीला रसायनशास्त्रामध्ये 95 व स्मितलला भौतिकशास्त्रामध्ये 94 गुण मिळाले.

कोकणी विषयात नुपुर नवगुंडकर व राम करमली यास सर्वाधिक 96 गुण मिळाले. संस्कृतमध्ये तनुजा मांद्रेकरला 95, पोर्तुगीजमध्ये सोहिल मिनेझीसला 85 व फ्रेंचमध्ये फ्रेझियर जेसुसला 99 गुण मिळाले. मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई अनंत नायक, व्यवस्थापक, प्रिंसिपल व शिक्षकांनी उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT