Road Issue Dainik Gomantak
गोवा

Road Issue In Saleli, Goa: वीज खात्याच्या 'त्या' प्रकारामुळे रस्ते धोकादायक, सालेली ग्रामस्थ हैराण

अपघाताला आमंत्रण ः सालेली-झर्मे रस्त्यांवरील प्रकार, कंत्राटदारांचे दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Road Issue In Saleli, Goa होंडा पंचायत क्षेत्रांत येणाऱ्या सालेली येथे काही दिवसांपूर्वी वीज खात्याने रस्ता खोदून वीज वाहिनी घातली, परंतु मधोमध खणलेला चर व्यवस्थित बुजविला नसल्याने त्या चरामुळे वाहन चालकांसाठी सदर रस्ता धोकादायक बनला आहे.

सदर खड्डा झर्मे ते होंडा व्हाया सालेली या प्रमुख रस्त्यांवर असल्याने या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी वीज खात्याने वीज वाहिनी घालण्यासाठी रस्ता मधोमध खोदून दुसऱ्या बाजूने असलेल्या खांबावर वीज जोडणी केली होती.

परंतु या ठिकाणी खोदलेला खड्डा किंवा चर व्यवस्थित बुजवला नसल्याने त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून दलदल निर्माण होते. काही वेळेला पाणी भरले असल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने येथे छोटे मोठे अपघात घडत आहेत.

सदर ठिकाणी पडलेला चर वजा खड्डा हा सालेली-झर्मे दरम्यानच्या रस्त्यावर असल्याने येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्याचप्रमाणे सध्या पावसाळी पर्यटन सुरू असल्याने सालेली भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे अगदी मधोमध खणलेला हा चर सर्वांना धोकादायक ठरला आहे. यांची दखल घेऊन तेथे रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी होंडा पंचायतीच्या उपसरपंच रेशम गावकर यांनी केली आहे.

अपघाताची शक्यता

अनेक ठिकाणी वीज खात्याने केबल घातल्या, पण चर बुजविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाहनचालक, तसेच पादचाऱ्यांनाही या खड्ड्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

भरधाव वाहने चालविणाऱ्यांना तर हा खड्डा धोकादायक असून अपघाताची अधिक शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील वाहनचालकांनी सावकाश वाहने हाकावी, अशी प्रतिक्रिया येथील ज्येष्ठ नागरिकांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT