Goa Mid Day Meal Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील शाळांना दर्जेदार माध्यान्ह भोजन पुरवण्यासाठी अक्षय पात्रासोबत भागीदारी; स्वयं सहाय्य गटांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुख्यमंत्री: जे स्वयं-सहायता गट (SHGs) दर्जेदार जेवणाचा पुरवठा करतील त्यांचे काम सुरू ठेवण्यात येईल

Kavya Powar

Goa Mid Day Meal: काही दिवसांपूर्वी सावईवेरे, केपे आणि वाळपई येथील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्न आहारात अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर आहार पुरवणाऱ्या स्वयं सहाय्य गटाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे मत पालकांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

राज्यभरातील शाळांना दर्जेदार माध्यान्ह भोजन पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने अक्षय पात्राला बोर्डावर घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केली. असे असले तरी, जे स्वयं-सहायता गट (SHGs) दर्जेदार जेवणाचा पुरवठा करतील त्यांचे काम सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

माध्यान्न आहारात अळ्या सापडल्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, यापुढे राज्य सरकार अशा घटना खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार माध्यान्ह भोजन पुरवठा करणे गरजेचे आहे. मी सभागृहात सांगितले आहे की, दुपारचे जेवण विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी पुरवले जाते, इतर कुणाच्याही फायद्यासाठी नाही. विद्यार्थ्यांना पुरवले जाणारे दुपारचे जेवण खाण्यास पात्र असावे.

त्यामुळे अशा घटना पुन्हा घडल्या तर सरकार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT