Goa Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर हायकोर्टाची दखल; राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस

Supreme Court Stray Dog Directions: उच्च न्यायालयांना आपापल्या राज्यात स्वेच्छा याचिका नोंदवून घेण्याचे निर्देश देखील दिले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची दखल घेत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्वेच्छा जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे २०२६ मध्ये दिलेल्या एका आदेशात सार्वजनिक जागांवर भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर नसावा, असे स्पष्ट केले होते.

तसेच या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व उच्च न्यायालयांना आपापल्या राज्यात स्वेच्छा याचिका नोंदवून घेण्याचे निर्देश देखील दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मे महिन्यातील निर्देशानंतर दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी उच्च न्यायालयाने याविषयावर कामकाज सुरू केलेले नाही.

या सादरीकरणाची नोंद घेत खंडपीठाने याप्रकरणी स्वेच्छा याचिका दाखल केली.याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पशुसंवर्धन संचालनालय आणि इतर संबंधित विभागांना पक्षकार करून त्यांना नोटीस बजावली आहे.

५ ऑगस्टच्या सुनावणीत घेणार आढावा

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत यासंदर्भात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात आवश्‍यक गोष्टींचा आढावा यामध्ये घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT