Birch by Romeo Lane Fire Dainik Gomantak
गोवा

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Birch By Romeo Lane Fire Case: हडफडे येथील प्रसिद्ध ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबचे मालक व भागीदार सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला सशर्त जामीन गोवा खंडपीठाने रद्द केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हडफडे येथील प्रसिद्ध ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबचे मालक व भागीदार सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला सशर्त जामीन गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. तसेच या तिन्ही आरोपींना दोन आठवड्यांच्या आत पोलिसांसमोर किंवा न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने दिलेला आत्मसमर्पणाचा आदेश व जामीन रद्दीकरणाला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने जामीन रद्द करताना आरोपींना कायद्यानुसार नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे.

तसेच, आरोपींनी असा अर्ज सादर केल्यास सत्र न्यायालयाने त्यावर कोणतीही पूर्वग्रहदूषित भूमिका न घेता, गुणवत्तेच्या आधारावर पुढील दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत. सत्र न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारी पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा जामीन फेटाळून लावला.

दरम्यान, ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत तब्बल २५ जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला होता. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर क्लब चालवण्यासाठी आवश्यक सुरक्षा व प्रशासकीय परवानग्या नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तिघांवरही निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT