Shortage of Vegitables in Bicholim, Goa. On Monday, 26 July, 2021.  Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचा पुरवठा मंदावला

येत्या काळात भाजीपाला (Vegetables) महागण्याचे संकेत (Goa)

Tukaram Sawant

Bicholim: मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची (Vegetables from Karnataka) आवक घटली आहे. त्यामुळे सध्या डिचोलीत भाजीपाल्याचा तुडवडा जाणवत आहे. सध्या भाजी मार्केट (Vegetable Market) आणि शहरातील भाजी विक्री गाळ्यांवर मोजक्या प्रकारचाच भाजीपाला उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे, तसेच भाजीपाल्याचे प्रमाणही घटल्याचे निदर्शनास आले. शहरातील फलोत्पादन महामंडळाच्या दुकानांवरही तशीच परिस्थिती आहे. भाजीपाल्याचा तुटवडा असल्याने (Shortage of vegetables) भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत असून, ते अजून वाढण्याचे संकेत काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

डिचोली शहरात कर्नाटकातील बेळगाव मधून नियमित भाजीपाल्याची आवक होत असते. मागील आठवड्यात चोर्ला मार्ग वाहतुकीस बंद असतानाचा अपवाद वगळता बेळगावमधून भाजीपाल्याची वाहतूक चालूच आहे. परंतु भाजीपाल्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या टोमॅटो, बटाटा आणि कांद्याचे दर 40 रुपये किलो झाले आहेत. वालपापडी 120 रू. किलो दराने विकली जात आहे. अन्य भाज्यांच्या दारांत थोडीफार वाढ पहायला मिळाली. फलोत्पादन महामंडळातर्फे पुरवठा केल्या जाणाऱ्या भाज्यांचे दरही सोमवारपासून वाढलेले आहेत. प्रत्येक भाजीमागे किमान 5 रुपये वाढलेले आहेत.

अतिवृष्टीचा परिणाम

पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाजीची आवक घटली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कर्नाटकात राज्यात भाजीपाल्यांचे मळे पाण्याखाली गेल्याने भाजीपाल्याचे प्रमाण घटले आहे. परंतु येत्या दोन ते तीन दिवसात भाजीपाल्याचा पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे, असे डिचोली येथीलभाजी विक्रेते सुनिल पाटील यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT