Panaji Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Panaji Dengue Cases: सावधान! पणजीत वाढताहेत डेंग्यूचे रुग्ण; खबरदारी घेण्याचे आवाहन

दरदिवशी चार ते पाच रुग्ण बाधित

Kavya Powar

Panaji Dengue Cases: गोव्यात सध्या साथीच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये डेंग्यूचे रुग्णही झपाट्याने वाढत आहेत. प्रामुख्याने कळंगुट किनारी भागात डेंग्यूचे रुग्ण वाढले होते, यामुळे एका महिलेचा मृत्यूही झाला होता.

त्यापाठोपाठ आता राजधानी पणजीतील रुग्णही वाढत असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. पणजीत दरदिवशी चार ते पाच रुग्ण आढळत आहेत. त्याचप्रमाणे अनेकांना श्वसनाचा त्रास असल्याचेही समोर आले.

वातावरणातील बदल, ऊन-पावसाचा खेळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

याच पार्श्वभूमीवर कळंगुटमध्ये मोफत डेंग्यू चाचणी उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामध्ये अनेकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. चाचणी केल्यानंतर 397 व्यक्तींपैकी 94 जण पॉझिटिव्ह आढळले.

आता पणजीतही डेंग्यूचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT