Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa’s Healthcare Boost: उत्तर गोवा इस्पितळात लवकरच ‘आयसीयू’! राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यातील आरोग्य सेवा चांगली; आरोग्यमंत्री राणे

Health Minister Vishwajit Rane:अतिदक्षता विभाग उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात लवकरच सुरू केला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत दिली.

Sameer Panditrao

पणजी: इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील आरोग्य सेवा अत्यंत चांगली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला आहे आणि उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात लवकरच सुरू केला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी आज विधानसभेत दिली. याविषयीचा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारला होता.

आरोग्यमंत्री म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सरकार टप्प्या टप्प्याने सुधारणा करत आहे. सगळ्याच गोष्टी एका रात्रीत करता येत नाहीत. अस्थिव्यंगशास्त्र आणि स्नायूविज्ञान हे विभाग सुरू करण्याचा विचार आहे. केवळ पायाभूत सुविधा किंवा यंत्रसामग्री आणली म्हणजे विभाग सुरू करता येत नाहीत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर शोधावे लागतात. डॉक्टर आरोग्य सेवेत राहतील यासाठी प्रयत्न करावे लागतात. राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यातील आरोग्य सेवा चांगली असली तरी सरकार त्यावर समाधान मानून गप्प बसत नाही. ‘एचएलएल’ला त्यासाठी सोबत घ्यावे लागेल त्यांच्या सोबतीने आम्ही काम करणार आहोत.

आलेमाव यांनी दक्षिण गोव्यातील काणकोणपासून मडगावपर्यंत असलेली सरकारी इस्पितळे केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण पाठवण्याचे काम करत आहेत. मडगाव येथील जिल्हा इस्पितळाचे नामकरण सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र असे करावे, अशी खोचक सूचनाही त्यांनी केली.

ते म्हणाले अति हार्डवेअर आहे मात्र सॉफ्टवेअरची वाणवा आहे अशी आरोग्य खात्याची दशा झाली आहे. गेल्या पाच वर्षात १५ हजार ८४२ रस्ते अपघात झाले त्यात ९०० जणांनी जीव गमावले. पहिल्या चार तासांत चांगले उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काणकोण ते मडगाव पर्यंतच्या दक्षिण गोव्यातून बांबोळीत रुग्ण पाठवेपर्यंत त्याचा जीव जातो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांच्यावर कामाचा ताण आहे. या इस्पितळाची देखभाल एप्रिल २०२४ पासून बंद झाली आहे, याकडेही सरकारने लक्ष द्यावे.

दक्षिण जिल्हा इस्पितळात ‘एमआरआय’ नाही!

मडगावच्या जिल्हा इस्पितळात निदानासाठी आवश्‍यक असलेली ‘एमआरआय’ सुविधा उपलब्ध नसल्याच्या बाबीकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, भारतीय सार्वजनिक आरोग्य प्रमाणानुसार ज्या गोष्टी जिल्हा इस्पितळात आवश्यक आहेत. त्या मडगावच्या इस्पितळात नाहीत. त्या इस्पितळात बाह्य रुग्ण सेवा दुपारी एक वाजेपर्यंत उपलब्ध असते, ती सायंकाळी पाच वाजेपर्यंत तरी सुरू असावी. डॉक्टर चांगली सेवा देतात, पण वेळेच्या बाबतीतही लक्ष द्यावे,असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT