Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील प्रत्येक व्यक्तीवर 2 लाख रुपयांचे कर्ज, राज्याची आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल - आलेमाव

गोव्यात भ्रष्ट व्यवहार आणि हुकूमशाही सुरू आहे, आलेमाव यांचा आरोप

Pramod Yadav

LoP Yuri Alemao: गोव्यावर दरडोई 2 लाख रुपयांच्या कर्जाचे ओझं असून, राज्याची आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी केला.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाने पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात आलेमाव बोलत होते.

"गरिबी हीच सर्वात मोठी हिंसा आहे, असे महात्मा गांधी नेहमी म्हणत. म्हणूनच त्यांनी गरिबी हटवण्याचा प्रयत्न केला. पण आज पाहिलं तर… गोवा भीषण आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येक व्यक्तीवर दोन लाख रुपयांचे कर्ज आहे," असे युरी आलेमाव म्हणाले.

गोवा सरकार बेफिकीरपणे कर्ज घेत असून त्यामुळे गोमन्तकीयांवर कर्जाचा बोजा वाढत असल्याचा आरोप आलेमाव यांनी केला. गोव्यात भ्रष्ट व्यवहार आणि हुकूमशाही सुरू आहे, असे आलेमाव म्हणाले.

"पूर्वी गोव्यातील लोक श्रीमंत होते. कदाचित आमच्याकडे लाखोंनी पैसा नव्हता, पण आमच्याकडे खायला पुरेसे होते. आम्ही शेतीच्या कामात गुंतलेले होतो आणि मासे भरपूर होते. पण आज राज्यात गरिबी आहे."

"महात्मा गांधी ज्या तत्त्वांसाठी लढले त्या तत्त्वांच्या विरोधात सध्याची परिस्थिती आहे... आपण याचा विचार केला पाहिजे. महात्मा गांधी हे गरिबांचे नेते होते. पण आज आपल्या राज्यातील नेते श्रीमंतांचे नेते बनले आहेत. याचा आपण विचार करायला हवा." असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT