Goa Human Trafficking Dainiak Gomantak
गोवा

Goa Human Trafficking: हरमल वेश्याव्यवसाय प्रकरणात दोन संशयितांना जामीन, ठोस पुराव्यांचा अभाव; पीडित महिलांनी साक्ष देण्यास दिला नकार

Harmal Prostitution Case: हरमल येथील खालचावाडा परिसरात उघडकीस आलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात म्हापसा येथील उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित शिबानी दास (३४) आणि संजय कुमार (२८) यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: हरमल येथील खालचावाडा परिसरात उघडकीस आलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात म्हापसा येथील उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित शिबानी दास (३४) आणि संजय कुमार (२८) यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी वाचविलेल्या महिलांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष नोंदवण्यास नकार दिल्याने प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मांद्रे पोलिसांनी नारायणदेव मंदिराजवळ केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सात महिलांची सुटका केल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाच्या निरीक्षणानुसार या महिलांनी तपासात सहकार्य केलेले नाही. स्वयंसेवी संस्थेच्या उपस्थितीत नोंदवलेल्या जबाबांमधून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच, सातपैकी सहा पीडित तरुणींनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे सरकारी पक्षाची बाजू कमकुवत ठरली असून, संशयितांनी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे कोणतेही ठोस प्रथमदर्शनी पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांत आढळले नाहीत.

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, माजी सरपंचांच्या नेतृत्वाखालील एका गटाने केवळ मालमत्तेतून बाहेर काढण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल केला आहे. याउलट, सरकारी वकिलांनी भारतीय न्याय संहिता कलम १४३(३) अंतर्गत हा गंभीर गुन्हा असून त्यात जन्मठेपेची तरतूद असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, संशयितांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून तपास बराचसा पूर्ण झाल्याने त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने नमूद

केले.

परेश भट्टी यापूर्वीच सुटला

या प्रकरणातील तिसरा संशयित परेश भट्टी (३९, गुजरात) याला न्यायालयाने २४ मार्च २०२६ रोजीच सशर्त जामीन मंजूर केला होता. भट्टी हा केवळ ‘ग्राहक’ म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होता आणि ‘तस्करी’मध्ये त्याचा कोणताही सहभाग नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT