Goa GST: 285 crore tax collection in the state Dainik Gomantak
गोवा

Goa GST: राज्यात एकूण 285 कोटींचे कर संकलन

राज्यात (Goa GST) वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात कालावधीत गोव्यातून 285कोटी जमा झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

ऑगस्ट 2021 या महिन्यात देशाचे जीएसटी संकलन (GST Collection) एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे . याआधी मागच्या जुलै महिन्यातही केंद्र सरकारने जीएसटीच्या (Goods And Service Tax) माध्यमातून एक लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला होता. बुधवारी अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये 1.12 लाख कोटी रुपयांचा जीएसटी केंद्राला प्राप्त झाला आहे. हा आकडा गेल्या वर्षी याच महिन्यातील संकलनापेक्षा 30 टक्के अधिक आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात एकूण 1,12,020 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन (Tax Collection) झाले आहे. (Goa GST: 285 crore tax collection in the state)

तर राज्याच्या कर संकलनाचे आकडे देखील जाहीर करण्यात आले आहेत.राज्यात वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात कालावधीत गोव्यातून 285कोटी जमा झाले आहेत. गतवर्षी याच महिन्यात 213 कोटी जीएसटी जमा झाला होता.मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी संकलनात 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काल केंद्र सरकारने जीएसटीच्या रूपाने संपूर्ण देशभरातून केंद्र सरकारच्या तिजोरीत 1 लाख 12 हजार 20 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. यात राज्यांची कर रक्कम 26 हजार 605 कोटी असून केंद्राचा वाटा 20 हजार 522 कोटी इतका आहे. दोन्ही कर मिळून जीएसटी संकलन 56 हजार 240 कोटी रुपये झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

स्त्रियांवर होणारे अत्याचार कधी थांबणार? कुडचडेच्या घटनेने समाजाचा चेहरा विद्रूप; खापर फोडण्यात आपण 'माहीर', पण जबाबदारी कुणाची?

भळभळती आठवण- संपादकीय

24 एप्रिलपर्यंत खट्टरला अटक करा! सरदेसाईंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार!"

Goa Mining: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात खाणकाम जोरात! 24 ठिकाणी खनिजाचा महालिलाव; सरकारला सुरुवातीलाच मिळणार 200 कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT