Goa Panchayat Online Services 
गोवा

Goa Panchayat: गोव्यातील सर्व पंचायतीत मिळणार आणखी नऊ सेवा ऑनलाईन, जाणून घ्या शुल्क

ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त नऊ ऑनलाईन सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Goa Panchayat: ग्रामस्थांना सोईस्कर सुविधा देण्यासाठी गोवा राज्य सरकारतर्फे ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त नऊ ऑनलाईन सेवा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे.

पंचायत पातळीवरील या सेवा ऑनलाईन पद्धतीने गोवा ऑनलाईन पोर्टलवर 3 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहेत. या सेवांचे शुल्कही निश्चित केले आहे.

ऑनलाईन मिळणाऱ्या सेवा आणि शुल्क

बांधकाम परवाना अर्ज (500 रुपये), व्यापार परवाना फलक वा जाहिरात लावण्यासाठी अर्ज (50 रुपये), भोगवटा प्रमाणपत्र अर्ज (500 रुपये), जन्म दाखला (10 रुपये),

मृत्यू दाखला (10 रुपये), पाणी जोडणीसाठी ना हरकत दाखला (50 रुपये), वीज जोडणीसाठी ना हरकत (50 रुपये), उत्पन्नाचा दाखला (10 रुपये), रहिवासी दाखला (10 रुपये).

माहिती-तंत्रज्ञान खात्याने सुरू केलेल्या सिटीझन सर्व्हिसेस सेंटरअंतर्गत 27 विभागांच्या 170 सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. ‘ग्रामीण मित्र’ संकल्पनेद्वारे सरकारी सेवा घराघरांत पोहोचवण्यात येणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी मे महिन्यात केली होती.

आयटी खात्याच्या वतीने ‘ग्रामीण मित्र’ नेमण्यात येणार असून या ग्रामीण मित्रांमार्फत  सरकारी  योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार डिजिटल गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

West Nile Virus: वेस्ट नाईल व्हायरसने जगभरात वाढवली चिंता! लहान मुलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

SCROLL FOR NEXT