Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Goa: तुरूंगात कैद्याचा मृत्यू झाल्यास मिळणार भरपाई, गोवा कारागृह नियमावलीत दुरुस्ती

गोवा कारागृह नियमावलीत दुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार ही भरपाई लागू करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

compensation to prisoners: तुरूंगात कैद्याने आत्महत्या केली, तर त्याच्या कायदेशीर वारसाला 3 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. गोवा कारागृह नियमावलीत दुरुस्ती करण्यात आली असून त्यानुसार ही भरपाई लागू करण्यात आली आहे.

याशिवाय इतर कैद्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यास 4 लाख रुपये, तेथील अन्य कर्मचाऱ्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, स्वतः जखमी करून घेतल्याने मरण पावल्यास 3 लाख रुपये, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये व अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 3 लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे.

कारागृहात कैद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कारागृह अधीक्षकांनी दंडाधिकारी चौकशी अहवाल, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूचे अंतिम कारण, कारागृहात दाखल करतानाचा वैद्यकीय इतिहास आणि वैद्यकीय उपचारांचा तपशील, याच्या प्रतीसह तपशीलवार अहवाल पाठवा लागणार आहे.

दरम्यान, राज्यातील एकमेव मध्यवर्ती कारागृह असलेल्या कोलवाळ कारागृहात कैदी आणि अंडरट्रायल कैद्यांची गर्दी झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 पर्यंत मध्यवर्ती कारागृहात 109 टक्के फुल्ल झाल्याचे समोर आले आहे.

एनसीआरबीनुसार, मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 624 कैद्यांची आहे, परंतु त्यात 681 कैदी ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT