Goa Cabinet Dainik Gomantak
गोवा

Goa English Medium Schools: इंग्रजी शाळांना मान्यता नाही! कोकणी भाषा मंडळाच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Goa English Medium Schools: राज्य सरकार मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य देत असताना इंग्रजी शाळा सुरु करण्याचे प्रयत्न राज्यासाठी धोकादायक आहेत.

Pramod Yadav

Goa English Medium Schools

कोकणी भाषा मंडळाने राज्यात नव्याने सुरु होणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना विरोध दर्शवला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच मिळावे असे केंद्र शासन सांगते, मात्र या राज्यात काही ठिकाणी इंग्रजी शाळा सुरु होत असल्याने मंडळाने पत्राद्वारे चिंता व्यक्त केली.

मंडळाच्या या विरोधाची मुख्यमंत्री सावंत यांनी दखल घेतली असून, राज्यात नव्या इंग्रजी शाळांना मान्यता दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी किंवा कोंकणी भाषेसाठी मान्यता घेऊन इंग्रजी माध्यमातून शाळा सुरू असल्यास कारवाई केली जाणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

कोकणी भाषा मंडळाच्या वतीने राज्यात नव्याने सुरु होणाऱ्या इंग्रजी शाळांबाबत चिंता व्यक्त केली होती. काही ठिकाणी अशा शाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, यासाठीचा ना हरकत अर्ज मंडळाच्या निदर्शनास आला.

राज्य सरकार मातृभाषेतून शिक्षणास प्राधान्य देत असताना इंग्रजी शाळा सुरु करण्याचे प्रयत्न राज्यासाठी धोकादायक आहेत, तसेच आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे मंडाळाच्या पत्रात म्हटले आहे.

मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे असे नवे शिक्षण धोरण सांगते तसेच, शिक्षणजज्ञ आणि बालशिक्षण आणि बाल मानसशास्त्रज्ञ देखील सांगतात. सरकारने नव्या इंग्रजी शाळांना परवानगी द्यायची नाही, अशी भूमिका घेतलीय, असे मंडळाने या पत्रात उल्लेख केला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी याची दखल घेत नव्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT