Goa Govt Manohar Parrikar Yuva Scientist Award Dainik Gomantak
गोवा

मोठी बातमी! गोवा सरकारकडून मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराची घोषणा, मिळणार पाच लाखांचे बक्षीस

या पुरस्काराच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञांना पाच लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.

Pramod Yadav

Goa Govt Manohar Parrikar Yuva Scientist Award (MPYSA)

गोवा सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. देशातील युवा शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारने दरवर्षी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून युवा शास्त्रज्ञांना पाच लाख रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.

विज्ञान - तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान - तंत्रज्ञान आणि संशोधन विषयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देश पातळीवरील युवा शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय.

या पुरस्कारामार्फत पाच लाख रूपयांचे बक्षीस एका शास्त्रज्ञाला देण्यात येईल, बक्षीस रकमेची दरवर्षी संबधित विभागाच्या अर्थसंकल्पात केली जाईल.

शास्त्रज्ञ भारतीय नागरिक असावा त्याचे वय 35 पेक्षा अधिक असू नये. विज्ञान - तंत्रज्ञान आणि संशोधन विषयात त्याने काम केलेले असावे आणि एका शास्त्रज्ञाला एकदाच हा पुरस्कार घेता येईल असे सरकारच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरवर्षी पुरस्कारासाठी अर्ज मागविल्यानंतर उमेदवारांना विभागाच्या ईंमेलवरती अर्ज करावा लागेल. विभागाकडून अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील त्यानंतर तज्ञ समितीसमोर अखेरचे प्रेझेंटेशन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT