Goa News|Historical Places | Dainik Gomantak
गोवा

Goa News: केवळ मंदिर नव्हे भेदभाव न करता चर्च आणि मशिदी देखील... आलेमाव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारने केवळ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील इतर ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे व इतर धर्मांची स्थळे सरकारच्या प्राधान्यक्रमात नाहीत. असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हटले.

दैनिक गोमन्तक

Goa News: ऐतिहासिक महत्त्व असलेली स्थळे तसेच किल्ले, चर्च आणि मशिदींच्या जिर्णोद्धारांसाठी भेदभाव न करता सरकारची मंदिरासाठीची जीर्णोद्धार योजना लागू करावी, अशी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी विनंती केली आहे.

आलेमाव यांनी या पत्रात म्हटले आहे की, सरकारने केवळ मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील इतर ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे व इतर धर्मांची स्थळे सरकारच्या प्राधान्यक्रमात नाहीत.

पुरातत्त्व खात्याच्या मंत्र्यांनी सरकारने सुरू केलेली योजना केवळ मंदिरांसाठी आहे आणि चर्च किंवा मशिदींना लागू होणार नाही, असे वक्तव्य करून जनतेमध्ये दुजाभाव निर्माण केल्याचेही आलेमाव यांनी लक्षात आणून दिले आहे.

मंदिरांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या आधारे जीर्णोद्धार करण्यासाठी जनतेचा निधी खर्च करण्याचा सरकारचा हेतू असल्यास, सरकार दुहेरी मापदंड ठेवून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या इतर धर्मांच्या स्थळांशी भेदभाव करून त्यांना निधी नाकारू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

नार्वे येथे अस्तित्वात असलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी शासनाने पावले उचलली याचा आपणास आनंद आहे.

कुंकळ्ळी येथील चीफटेन्स स्मारक, मडगाव येथील लोहिया मैदान, पणजी येथील आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक तसेच गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित इतर ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आज जीर्णोद्धार व सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

किल्ल्यांचे जतन आवश्‍यक

बेतुल, शापोरा, कोलवाळ आणि इतर किल्ल्यांचे देखील संरक्षण, जतन आवश्यक आहे. ही सर्व स्थळे त्वरीत ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे म्हणून अधिसूचित करणे आवश्यक आहे, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT