Charavane Dam  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : गोवा मुक्तीनंतरचा 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

15 गावांची तहान भागणार : याआधी तांत्रिक कारणांमुळे झाला होता रद्द

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi : सत्तरी तालुक्यात डोंगुर्ली-ठाणे पंचायत क्षेत्रातील चरावणे गावात काही वर्षांआधी धरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यावेळी अनेक तांत्रिक कारणांमुळे तो रद्द झाला होता. पण आता भाजप सरकारने या चरावणे धरण प्रकल्पासाठी कंबर कसलेली आहे. गोवा सरकारच्या वन्यजीव महामंडळाने या धरण प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चरावणे धरण प्रकल्प आशादायी बनलेला आहे.

सरकारच्या या निर्णयाचे डोंगुर्ली-ठाणे, म्हाऊस पंचायतीने स्वागत केलेले आहे. अंदाजे 2006 साली चरावणे गावात धरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु त्यावेळी अनेक सोपस्कार पूर्ण न झाल्याने काम रद्द करण्यात आले होते. परंतु आता वन्यजीव महामंडळाकडून मान्यता मिळाल्यामुळे तब्बल सतरा वर्षांनंतर धरण कामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या चरावणे धरणामुळे डोंगुर्ली, ठाणे, म्हाऊस ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याची सोय, शेती बागायतीसाठी सोय होणार आहे. त्यामुळे गोवा मुक्तीनंतरचा अतिमहत्त्वाकांक्षी असा धरण प्रकल्प हाती घेतल्यास दोन्ही पंचायत क्षेत्रे सुजलाम्‌ सुफलाम्‌ होण्यास वाव मिळणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी प्रामुख्याने या प्रकल्पासाठी कंबर कसलेली आहे. यातून परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास लाभ होईल, तसेच आजूबाजूच्या जंगलातील प्राण्यांनाही लाभ होईल.

आजही विविध गावांत पाण्याची चिंता भेडसावते. या महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पामुळे पाण्याची आजवरची समस्या सुटणार आहे. आता सरकारने पुढील आवश्यक मान्यतेचे सोपस्कार पूर्ण करून चरावणे धरण प्रकल्पासाठी शीघ्रगतीने कार्यवाही हाती घेतली पाहिजे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

- सरिता गावकर, सरपंच, ठाणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

SCROLL FOR NEXT