Governor P.S Shridhran Pillai Dainik Gomantak
गोवा

Governor P.S Shridhran Pillai: सर्वधर्मियांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज

Governor P.S Shridhran Pillai: राज्यपाल पिल्लई : बिशप आल्वारीस यांची निःस्वार्थी सेवा प्रेरणादायी

गोमन्तक डिजिटल टीम

Governor P.S Shridhran Pillai संपूर्ण मानवजाती ज्या आध्यात्मिक ध्येयांसाठी झटत आहे, ते ध्येय साध्य करण्यासाठी सर्व धर्मांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे सांगत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गरीब आणि गरजूंना मदत करताना बिशप आल्वारीस मार ज्युलियस (प्रथम) यांच्या निःस्वार्थ सेवेची आठवण करून दिली.

ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये शताब्दी स्मृतीप्रीत्यर्थ नुकत्याच आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

दरम्यान,2023-24 या वर्षीचा ‘अल्वारेस मार ज्युलियस पुरस्कार’ गरीब आणि आदिवासींच्या हक्कांसाठी झटणाऱ्या बहीण दयाबाई यांना प्रदान करण्यात आला.

राज्यपाल यांच्या हस्ते दयाबाईंना पुरस्कार, प्रशस्तिपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपालांनी आपल्या भाषणात देशातील आध्यात्मिक वारशाचे स्मरण करून दिले. ‘एकम सत् विप्र बहुधा वदन्ति’ या आदर्शाने विविधतेतील एकता जोपासल्याचे सांगितले.

एच. एच. बासिलोस मार्थोमा मॅथ्युज (तृतीय) यांनी भाषणात आल्वारीस मार ज्युलियस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गरिबांची सेवा करणे आणि चर्चला समर्पण करणे हे संकट काळातही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

देशभरातून हजारोंची उपस्थिती

सांतिनेज येथील स्मशानभूमीपासून पदयात्रा काढण्यात आली होती. सेंट मेरी ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चमध्ये बिशप ज्युलियस यांना दफन करण्यात आले होते, त्या ठिकाणापर्यंत ही पदयात्रा होती.

रायबंदर चर्चचे फा. वर्गीस फिलीफोस यांचे स्वागतपर भाषण झाले. संयोजक रेजू आलेक्स यांनी आभार मानले. या कार्यक्रमास देशभरातून हजारो लोक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

SCROLL FOR NEXT