Goa Governor | Sreedharan Pillai
Goa Governor | Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

Goa News: राज्यपालांनी घेतले लईराई देवीचे दर्शन

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी मये मतदारसंघातील श्री लईराई आणि श्री सप्तकोटीश्वर देवस्थानांना भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले. ‘गोवा संपूर्ण यात्रा’अंतर्गत राज्यपालांनी मये मतदारसंघाचा दौरा केला.

शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन घेतले. लईराई देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करून राज्यपाल पिल्लई यांनी ‘गोवा संपूर्ण यात्रा’अंतर्गत मये मतदारसंघ दौऱ्याची सुरवात केली. शिरगाव येथे श्री लईराई मंदिरात आगमन होताच मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि इतरांनी राज्यपालांचे स्वागत केले.

यावेळी श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष गणेश गावकर आणि पदाधिकारी, शिरगावच्या सरपंच करिष्मा गावकर, उपसरपंच जयंत गावकर, अन्य पंच तसेच सरकारी अधिकारी आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. देवस्थान समितीतर्फे राज्यपालांचा शाल आणि श्री लईराई देवीचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.

सप्तकोटेश्वराच्याही सेवेस

सायंकाळी राज्यपाल पिल्लई यांनी शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराला भेट दिली व श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. तसेच त्यांनी श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरण कामाची पाहणीही केली. सर्वप्रथम देवस्थान समितीतर्फे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचे स्वागत करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: शंकर पोळजींना 'राखणदार' होणे भोवले, हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी डिचोलीत तक्रार

Goa Live News Update: मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ

Rekha Jhunjhunwala: एका दिवसात गमावले 800 कोटी; रेखा झुनझुनवालांना कोणत्या कंपनीमुळे बसला फटका

South Goa : दक्षिणेतून भाजपचाच उमेदवार निवडून येईल! मंत्री रवी नाईक यांना विश्वास

Bicholim News : कासरपाल संदीपक शाळेसंदर्भातील आरोप तथ्यहीन : डॉ. चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT