reservation in Post Graduate  Dainik Gomantak
गोवा

Panaji: आरक्षणासाठी बहुजन समाजाचा राज्य शासनाविरोधात एल्गार

दैनिक गोमन्तक

एसटी, एससी आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरक्षण मिळू शकणार नाही. कारण या समाजातील उमेदवारांना 41% आरक्षण देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी राज्य शासनाने केली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज एका बैठकीचे आयोजन म्हापसा येथे करण्यात आले होते.

(Goa governments failure to provide reservation in Post Graduate programmes of Medical and Dental College)

या बैठकीला उपस्थित काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून एसटी, एससी आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांपासून गोवा सरकारने वंचित ठेवले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत विविध शाखांमध्ये आरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे. गोवा सरकारने (Government) त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा सर्वच्या सर्व मागासवर्गीय समाज रस्त्यावर उतरेल.

या बैठकीला नोंदणीकृत एसटी, एससी आणि ओबीसी समाज संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 6 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 28 मागासवर्गीय समाजातील लोक पणजी येथील आझाद मैदानावर एकत्र जमत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा ठराव करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT