गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा Dainik Gomantak
गोवा

Goa: गणेशोत्सवासाठी नविन ‘SOP’

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यावरील (Goa) कोरोनाचे (Covid-19) संकट अजूनही संपलेले नाही. त्यामुळे गोमंतकीयांना यंदाही गणेशोत्सव (Ganesh Festival) साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारसोबत विचारविनिमय करून नवी (SOP) आदर्श कार्यप्रणाली लागू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) दिली आहे. (Goa government will announce new SOP for Ganeshotsav)

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र गणेशमूर्तीच्या रंगकामाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. राज्यात रोज शेकडो लोक कोरोनाबाधित आहेत. शिवाय रोज एक-दोन, एक -दोन मृत्यू होत आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावीच लागणार आहे. अशातच कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केरळमधून येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. इतर राज्यांसाठी हा नियम काहीसा शिथिल केला असून दोन लसीचे डोस घेतलेल्यांना किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणेआवश्यक आहे.

कर्नाटकात वीकेण्ड लॉकडाऊन सुरू

केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने कर्नाटक सरकारने ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ सुरू केला आहे. तो दोन दिवसांसाठी कायम असल्याने कर्नाटकात येजा करणाऱ्यांनी या संबंधीची माहिती घेऊनच प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक प्रवेश शुल्कात 50% कपात

गोवा सरकारने उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांच्या यंदाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी 50 टक्के शिक्षण शुल्क तसेच जिमखाना शुल्क व सांस्कृतिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. कोरोना महामारीमुळे पालक व विद्यार्थी कठीण परिस्थितीतून जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT