Goa Assembly Session | Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

Goa Two Wheelers Pilot: मोटारसायकल पायलटसाठी विशेष योजना; सरकार देतंय परवाने, संधीचा लाभ घ्या

Transport Minister Mauvin Godinho: रेंट अ कॅब व रेंट अ कार परवाने आपण बंद केले आहेत. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे आपणास तो निर्णय घ्यावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : रेंट अ कॅब व रेंट अ कार परवाने आपण बंद केले आहेत. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे आपणास तो निर्णय घ्यावा लागला. विधानसभेत मोटारसायकल पायलटांसाठी विशेष योजना आपण जाहीर केली आहे. पर्यटनात या सेवेचा मोठा वाटा आहे. कोणाला मोटारसायकल पायलट व्यवसाय करायचा आहे, त्यांना परवाना दिला जाईल, अशी घोषणा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली.

येथील कदंब बसस्थानक परिसरात उभारलेल्या मोटारसायकल पायलटांसाठीच्या शेडचे हस्तांतरण केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी रोटरी क्लबचे जिल्हा गव्हर्नर शरद पै, गौरीश धोंड, निखील लवंदे, तन्वी सावंत, मिथिला नाडकर्णी, कदंब परिवहन महामंडळाचे डेरिक नेटो, मोटारसायकल पायलट संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते.

गुदिन्हो म्हणाले, रोटरी क्लबने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मोटारसायकल पायलट कष्ट घेतात. मोठ्या संख्येवरून पायलट संख्या कमी झाली आहे, त्याला वेगवेगळी कारणे आहेत. अनेक वर्षे पर्यटन व स्थानिकांसाठी सेवा देणारी ही मोटारसायकल पायलट सेवा आहे. त्यांच्यासाठी निवृत्ती योजना, नवे इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत योजना सुरू होईल. राज्यात ईव्ही बसेससाठी चार्जिंग स्टेशनची गरज आहे, त्यावर उपाय काढला जात आहे. प्रदूषण रोखण्यासाठी या बसेस महत्त्वाच्या असल्याने व इतर इलेक्ट्रिक वाहनेही वाढणार असल्याने त्यादृष्टीने चार्जिंग स्टेशन वाढणे आवश्‍यक आहे.

सुरेश ठाकूर म्हणाले, मोटारसायकल पायलट कमी झालेले आहेत. यापूर्वी सात हजार पायलट होते, ते आता दोन हजारांपर्यंत आहेत. आता पायलटांसाठी परवाने देणे बंद झाले आहे, हे परवाने देण्यास सरकारने सुरवात करावी. कारण कोण पायलट होऊ इच्छित असेल तर त्यांना ती संधी मिळावी. ज्यांना कोणास परवाने हवे असतील तर त्यांना ते द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT