Goa Medical College  Dainik Gomantak
गोवा

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Endoscopic Skul Based Surgery: गोवा सरकार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी 2025 पासून नाकातून होणार मेंदूची शस्त्रक्रिया सुरु करणार आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा सरकार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी 2025 पासून नाकातून होणार मेंदूची शस्त्रक्रिया (Endoscopic Skul Based Surgery) सुरु करणार आहे. यासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले असून या शस्त्रक्रियेमुळे गोवा आणि कोकण भागातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना 10 लाख रुपये खर्च करावे लागत होते जे आता गोमंतकीय रुग्णांना मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

पत्रकार परिषदेत डॉ. बांदेकर यांनी माहिती दिली असून यावेळी त्यांच्यासोबत नॉर्थवेस्ट कम्युनिटी हॉस्पिटलमधील न्यूरोसायन्सचे अध्यक्ष न्यूरोसर्जन डॉ. अमीन कसाम, बॉम्बे हॉस्पिटल आणि एचएन रिलायन्स मुंबईचे सल्लागार ईएनटी सर्जन डॉ. निशित शाह, न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. पोनराज सुंदरम, ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. कॅमेगले डी सा, फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. आंद्रे फर्नांडिस आणि सल्लागार ईएनटी सर्जन डॉ. साई नायक यांची उपस्थिती होती.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील आरोग्य विभागाचे मंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली गोवा वैद्यकीय महाविद्यालय वेगाने प्रगती करत आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अंतर्दर्शक कपाल शस्त्रक्रिया सुरु होण्याच्या निर्णयाने गोवा आणि कोकण भागातील रुग्णांना मोठी दिलासा मिळाला आहे. यामुळे आता या भागात राहणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याची देखील गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT