Job Scam Dainik Gomantak
गोवा

Job Scam: शिक्षिका होण्याचे स्वप्न दाखवून 12 लाख उकळले! सरकारी नोकरीच्या नावाखाली गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Government Teacher Job Fraud: सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साईनाथ ऊर्फ निखिल नाईक, कल्पेश बुक्कम व नरेंद्र कुडाळकर अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदन भोसले पुढील तपास करीत आहेत.

पाळोळे येथील अमराज भंडारी हे तक्रारदार आहेत. फसवणुकीची वरील घटना ऑक्टोबर २०२४ साली बाळ्ळी येथे घडली आहे. संशयितांनी तक्रारदार व त्याचा भाऊ रविराज यांच्याकडून त्याच्या मेव्हणीला सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवून देऊ असे सांगून १२ लाख रुपये घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: गोमंतकीयांना उन्हाचे चटके! तापमानाचा पारा 35 अंशांवर, पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

नरकासुरांचा उच्‍छाद! ज्‍येष्‍ठ नागरिक हवालदिल; मध्‍यरात्रीपर्यंत गोंगाट, न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाचा कळस

Diwali Horoscope: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4 राशींचे नशीब चमकणार! नोकरी, शिक्षण अन् करिअरमध्ये मिळणार मोठे यश; घरात येणार आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT