Goa Covid Update Dainik Gomantak
गोवा

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या 516 कुटुंबियांना गोवा सरकारचा आधार

राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या 516 कुटुंबियांना सरकारने जाहीर केलेले 2 लाखांचे आर्थिक सहाय्य (अनुदान) वितरित केले आहे.

दैनिक गोमन्तक

Panjim: राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या 516 कुटुंबियांना सरकारने जाहीर केलेले 2 लाखांचे आर्थिक सहाय्य (अनुदान) वितरित केले आहे. याशिवाय अतिरिक्त अनुदान जाहीर केलेल्या 50 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदासानासाठी अर्ज तथा दावे करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हाधकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आतापर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांकडून 63 दावे स्वीकारले आहेत. हे सर्व दावे हाताळून 50 हजार रूपये दावेदारांच्या संबंधित बँक खात्यात जमा केले आहेत. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला 2 लाखांची सानुग्रह मदत मिळाली आहे. त्या लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण खात्याकडून प्राप्त करण्यात आली आहे. या यादीतील 453 लाभार्थ्यांना देखील 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत मिळाली आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 516 प्रकरणे हाताळली असून त्यांना मंजुरी दिली आहे, आणि एकूण 2.58 कोटी रुपये कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना वितरीत करण्यात आले आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानाअंतर्गत मदत मिळविण्यासाठी अर्ज, दावे पाठवण्याचे आवाहन केले आहे. दाव्यासाठीचे अर्ज northgoa.gov.in किंवा पोर्टल goaonline.gov.in या उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. हे अर्ज मामलेदार तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयातही उपलब्ध करण्यात आले असून तेथेही स्वीकारले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT